मुंबईमध्ये नुकत्याच झालेल्या पावसात प्रख्यात डॉ अमरापूरकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
त्याबद्दल खूप हळहळ व्यक्त केली गेली. कोण जबाबदार? कसे जबाबदार ?? त्या ठिकाणी एखादा नगरसेवक असता किंवा राजकारणी असता तर काय झाले असते? केवढा गहजब झाला असता वगैरे अश्या पोस्ट सगळीकडे फिरताहेत .... लगेच कोर्टात याचिका दाखल झाली ...असे का ? कारण जे गेले ते डॉक्टर अमरापूरकर हे फार प्रथितयश डॉक्टर होते. कुणी सर्वसामान्य व्यक्ती नव्हते.... खूप लोकांचे आजार त्यांनी बरे केले होते, इतकंच नव्हे तर आतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी अनेक प्रबंध सदर केले होते. एक प्रकारे त्यांच्या जाण्याने आपल्या देशाचे खूप मोठे नुकसान झाले. अश्या प्रकारे त्यांचा मृत्यू व्हावा हे खरोखरचं दुर्दैव. देशाची बौद्धिक मौल्यवान माणसे अशी एका पावसात वाहून जावी हे कुठल्याही हे कोणाही भारतीयाच्या दृष्टीने खचितच वाईट.
पण,
अजूनपर्यत फार कुणी खरोखरंच मनापासून दुखवटा जाहीर केलेला नाही...डॉक्टर्स व त्यांच्या संस्था सोडून.
सर्वसामान्य माणसाला किती वाईट वाटतंय ? राजकारण्यांना काय वाटतंय? काही नाही. डॉक्टरला
दवाखान्यात घुसून मारलं काय किंवा त्याचं हॉस्पिटल फोडलं काय किंवा तो वाहून गेला काय ...आज समाजाला डॉक्टरची किंमतच नाही हेच खरे. राजकारण्याविषयी तर बोलायलाच नको. पण ज्या पेशंटसाठी डॉक्टर जीवाचं रान करतात त्या समाजालाचं त्याच्याशी काही विशेष देणं घेणं नाही तिथे शब्दचं खुंटले ..
कुणी काहीही म्हणो ...though it is unfortunate and painful to say but I feel Indian society does not deserve great doctors...
डॉक्टरांच्या कुटुंबियाच्या दु:खात त्यांना परमेश्वर शक्ती देवो हीच प्रार्थना