स्त्री शिक्षण की पुरुष शिक्षण? ( Marathi & English version - scroll down for English version)
महात्मा फुल्यांनी बायकांना शिकवण्यापेक्षा पुरुषांना हे शिकवले असते की "घराच्या प्रत्येक स्त्रीला सन्मानाने कसे वागवावे आणि तिला स्वतंत्र अस्तित्व कसे द्यावे" तर फार बरे झाले असते. मग , आज शिकून सुद्धा बायकांची होणारी संसारातील फरपट आणि समाजात स्त्रियांना अजूनही मिळणारे दुय्यम स्थान ह्या विसंगती कायमच्या हद्दपार झाल्या असत्या. आज सुद्धा शिकलेल्या बायकांना नवऱ्याकडून किंवा कुटुंबातल्या इतरांकडून एक प्रकारचा दुय्यम भाव कायमच दिला जातो. त्यांच्याकडून नोकरी असूनदेखील घराचे सर्व काम करणे अपेक्षित असते. त्याचवेळी नवरोबा मात्र पाय पसरून टीव्ही बघायला किंवा मित्रांबरोबर फिरायला मोकळा असतो. इतकेच काय लग्नाच्या दिवशीच मुलींना त्यांचे नाव बदलावे लागते. मला आठवतेय , दहावीनंतर आम्ही मित्र मैत्रिणी वेगवेगळ्या कॉलेजमध्ये जाणार होतो. पुन्हा कधी भेटू न भेटू या विचाराने एक सर्वांचे " स्लॅम बुक" केले होते,ज्यात प्रत्येकाने आपले पूर्ण नाव, गाव आवडी - निवडी आणि बरेच काही लिहायचे होते. त्यात माझ्या एका मैत्रिणीने पूर्ण नाव या समोर काय लिहावे? तिने लिहिले - " मी इथे माझे पूर्ण नाव लिहून काय उपयोग ? माझे लग्न झाले की किंवा कुठल्याही मुलीचे लग्न झाले की तिचे पहिले, मधले आणि शेवटचे अशी तिन्ही नावे बदलतात. माझीही बदलतील. मग माझ्या आताच्या पूर्ण नावाला काय अर्थ आहे? त्याचे अस्तित्व माझ्या लग्नात संपणार आहे." हा होता माझा आयुष्यातला स्त्री अस्तित्व बद्दल पहिला धडा. आता हल्ली निदान बऱ्याच स्त्रिया या पूर्वीच्या नावाबद्दल आणि ते कायम ठेवण्याबाबत आग्रही असतात आणि त्या बाबत थोडेफार त्यांचे ऐकलेही जाते. बायका शिकून फक्त कमावत्या झाल्या पण त्या पैश्यावर त्यांचा किती हक्क असतो हाही विचार करायला हवा. नोकरीच्या ठिकाणी पुरुष सहकाऱ्यांचे वर्तन हाही एक स्त्रियांसाठी त्रासदायक प्रकार असतो. जोपर्यंत समाजातील सर्व शिक्षित किंवा अशिक्षित पुरुषांचा स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आमूलाग्र बदलत नाही, तोपर्यंत स्त्री शिक्षणाने काही मोजक्या बायकांचे भले झाले ही असेल आणि होत राहील. पण समाजाचा, त्यात पुरुष, इतर स्त्रिया, मुले आणि एकूण सामाजिक प्रथा असे सगळेच आले, असा सर्वांचाच बायकांना एक स्वतंत्र अस्तित्व आणि ओळख देण्याचा प्रयत्न केला जात नाही, तोपर्यत हे स्त्री शिक्षण, बायकांचे स्वातंत्र्य वगैरे नुसती "बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात" असा प्रकार आहे. स्त्रियांनी सुद्धा स्वतः चे नवऱ्याशिवाय, कुटुंबाशिवाय काय अस्तित्व आहे याचा शोध घ्यायला हवा. जेव्हा स्त्रिला, समाजात आदराचे स्थान असेल किंवा मिळेल, तेव्हा मग हे स्त्री शोषण, बलात्कार, कामाच्या ठिकाणी होणारा त्रास ह्या गोष्टी कमी होईल. त्यामुळे हे मोफत मुलींचे शिक्षण वगैरे घोषणा द्यायला छान आहे पण मुख्य प्राथमिक शाळेपासून मुलांचे आणि पुढे कॉलेज मध्ये सुद्धा नियमित दर् वर्षी स्त्रियांचा कसा मान राखावा , कसा त्यांचा आदर करावा, कसे बोलावे/वागावे याचे मूलभूत शिक्षण पुरुषांना देणे आवश्यक आहे. अगदी बायकांकडे कसे बघावे इथून शिकवणे आज गरजेचे आहे. थोडक्यात, आता स्त्री शिक्षणापेक्षा पुरुष शिक्षणाकडे जास्त लक्ष देणे गरजेचे आहे असे मला वाटते.
-------------------------------------------------------------------
" Women's education or men's education?
Mahatma Phule dedicated his whole life for women education and empowerment. It would have been better if he also would have taught men about how to respect every woman in their homes and how to give them independence. However, this issue has been ignored. Even today, despite women being educated, they are treated as second position to men in family. Even educated women often have to do traditional gender roles, expected to do all the household work alongside their jobs. But, the husband catagory simply relaxes in sofa watching TV or hanging out with friends. To start ,on the day of their wedding, girls' names are changed . I remember, after the tenth grade, we were all going to different colleges. So, we thought that we all friends may not again meet together. So, we started a "slam book" where everyone wrote their full name, address, hobbies and many other things. In it, one of the girl from our friend circle wrote- "What's the use of writing my full name here? Whether it's my or any girl's marriage, their first, middle, and last names change. Mine will change too. Then, what's the meaning of my current full name? Its existence will end with my marriage. Same is true for my address" That was the first lesson of my life regarding women's independence and their freedom. They don't have even freedom to keep their own name. Though, nowadays, many women want to retain their maiden names and they are given freedom about that too. Women are earning well now, but do they have right over their earnings ? Can they spend their hard earned money as per their wish ? I doubt. In the workplace, the behavior of male colleagues is also irritating for some women. Until perspective of all educated or uneducated men towards women changes significantly, women's education will continue to benefit some women, but it will still not give women respect and true freedom in society. Society as a whole has failed to give women an independent existence and recognition. These " women's education", " women's independence" etc, are just words to discuss in groups or in programs on channels . Women themselves need to understand what is their existence beyond their husbands, beyond their families. When women have a place of respect in society or when they achieve it, then violence against women, rapes, molestation at workplace will decrease. "Free education for girls" is a good announcement as a political slogan, but it is essential to teach men basic education from primary school onwards, how to behave decently with girls/women, how to respect them, and how to communicate with them. Even how to look at a girl/woman needs to be taught to all men. In short, now it is necessary to pay more attention to men's education than women's education, in my opinion."