Friday, January 13, 2023

Why I write?

 मी का लिहितो ?


मी बरेच काही लिहीत असतो. प्रत्येक लिखाण मी सर्वांना वाचायला देतो असे नाही. काही लेख मी कुणालाच दाखवत नाही. ( काही फक्त एखाद्या वक्तीस किंवा फक्त एका ग्रुपला " शेयर " करतो). किंबहुना खूपसे माझे लिखाण हे मी सोडून कुणीही बघितलेले नाही. असे का? कारण , मी जेव्हा काहीतरी लिहतो, तेव्हा त्याचा मूळ उद्देश हा माझ्या डोक्यात, मनात जे काही चालू असते ते बाहेर काढणे महत्त्वाचे असते. मग काही वेळा ते केवळ मनातील गोष्टींचा नीट मेळ घालण्यासाठी असते तर काही वेळा फार त्रास देणाऱ्या विचारांना बाहेर फेकून देण्यासाठी असते. कधी हे गद्य रुपात येते तर कधी त्याची कविता होते. ते माझ्या हातात नसते. हे मनातून, डोक्यातून आतून असे बाहेर येते ते, चांगलेच असेल हे काही निश्चित नसते. बरेचदा ते सामान्य किंवा वाईट सुद्धा असू शकते. आणि हे लेखन कुणाला आवडेल किंवा नाही याने मला काहीच फरक पडत नाही. मी लिहतो कारण मला लिहीत असताना आनंद मिळतो आणि ते पूर्ण झाल्यावर कुठेतरी आतमध्ये मला एक छान समाधान असते. बरेचदा असे होते की एखादी गोष्ट किंवा प्रसंग आपल्याला खूप भावतो, मग आपण त्याबद्दल काहीतरी लिहतो. ते खूप छान झाले आहे लेखन, असे वाटून मग आपण ते ' शेयर ' करतो इतरांबरोबर. पण त्यांना ते तेवढे आवडत नाही. काहीवेळा तर सोशल मीडिया वर काही रिस्पॉन्सही येत नाही. अश्या वेळी मन खट्टू होते. आपल्याला वाटते की काही खास जमत नाही लिखाण वगैरे. पण, मूलतः आपण का लिहितो हे प्रत्येकाने स्वतः शी ठरवले पाहिजे.  जर मी फक्त माझ्या आनंदासाठी, समाधानासाठी लिहीत असेन तर मग कुणाला ते आवडते का नावडते हे काही महत्त्वाचे नाही. हे लिहणे म्हणजे खरंतर एक स्वतः शी केलेला संवाद असतो. त्यातून आपल्याला काहीतरी स्वतः विषयी नवीन सापडत असते. काहीवेळा लिखाणातून नाती नीट समजतात, गोंधळ दूर होतात.  कधी अडचणींवर मार्ग सापडतो तर कधी पुढे काय करायचे आहे ते समजते. त्यामुळे आपले लेखन हा आपला स्वतः चा शोध  घेण्याचा एक प्रवास असतो हे प्रत्येक लेखकाने समजून घेतले पाहिजे. एकदा हे सर्व केवळ आपल्या आनंदासाठी, समाधानासाठी आहे हे कळले, की मग हा प्रवास खूप सुंदर आणि मस्त होऊन जातो. आणि म्हणून मी लिहित असतो.

YHYR

 


 

YHYR (Your health is your responsibility.)

If one looks at any doctor’s clinic, there are so many patients who are visiting the clinic at later stages of diseases. And they expect that a doctor should cure their illness. For example, chronic daily alcoholic, long standing uncontrolled diabetes or blood pressure or chronic smoker/tobacco chewer. In spite of known health hazards of alcohol/tobacco/smoking, people keep on consuming these substances for relief of stress or may be part of their addiction behaviour. Insights about one's own health are very poor in addicted people. But what about others? Diabetics & blood pressure patients and so many others, they keep on delaying medical check-up due to fear or some or other reasons. Such patients land in ICUs directly or even if fortunate enough, then go for consultations at the clinic. These patients are so advanced in their illness that mostly admission or a lot of investigations are needed. Though most are having significant disease related permanent damage, such patients and their relatives are absolutely not aware of the seriousness of the situation. Any advice regarding admission makes them sceptical about the doctor and his intentions. (Thanks to the damaging image of doctors in society)

Along with these, there are other patients who are visiting doctor for various reasons. These people are working and having lot of stressful job, erratic time schedules. When advised about exercise or a proper disciplined eating schedule, these patients are very prompt to say- “No that's impossible for me to exercise" or " my job is such that I may eat lunch at 3,4 or 5 pm or sometimes I skip it. Same about breakfast or dinner. In top of it they consume lot of junk food. After all this unhealthy patterns, still they expect that their illness need to cured by doctor and that to very fast as he/she can't take off from the "precious" job/project. A doctor may advice you diet/exercise schedule & if you say- I can't/it's impossible, he may tell again & again 2-3 times and still you ignore, then he will just give you a nice prescription and he will turn to next pt. That's it. Unless a patient is willing to put efforts in getting cured or unless he is taking the illness seriously, how one can expect a doctor will take it seriously? Paying consultation fees to dr assures you a diagnosis, prescription & advice regarding illness. So, better is to be more proactive about your health, your eating habits your schedule. Try to live a healthy lifestyle, otherwise sooner or later, one will have health issues. Visit to a clinic may give you diagnosis & some treatment, but that's a temporary solution. Finally, you have look at your 24 hours- how you spend, what you eat, which factors give you stress? And then make necessary corrections. Because after all, your health is your responsibility. Any doctor will treat you, help you, support you & guide you through your journey of illness to health. But you have to walk the path. 

वाळवी चित्रपट परीक्षण.

 " वाळवी" चित्रपट परीक्षण.


" वाळवी " अश्या एखाद्या नकोशा वाटणाऱ्या किड्याबद्दल कुणी पिक्चर काढलाय किंवा काढत आहे असे मी ऐकले असते तर डोक्याला हातचं लावला असता. जगात इतकी चांगली नावे असताना हे दळभद्री लक्षण का सुचलं कुणाला असे वाटले असते. पण परेश मोकाशी नावाचा माणूस असा चित्रपट तयार करतो तेव्हा मात्र आपल्याला दाखल घ्यावीच लागते. परेश मोकाशी यांचे आधीचे चित्रपट आठवले तर तुमच्या लक्षात येईल. हरिश्चंद्रची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी आणि चि व चि सौ कां. तिन्ही मध्ये खूप मोठी अशी गोष्ट नाही पण भरपूर प्रसंग निर्मिती  आणि त्यातून उलगडत जाणारी गोष्ट. तिन्ही चित्रपट चांगले होते. म्हणून मी हा चौथा बघायला गेलो.

 यूट्यूब वर ट्रेलर आहे तो जर तुम्ही बघितला असेल तर गोष्ट काय आहे हे कळले असेलच. ते तसेही फारसे महत्त्वाचे नाही. मोकाशी गोष्ट कशी खुलवून सांगतात ते बघायचे. आधीच्या तीन चित्रपटासारखेच येथे एक कथा आहे. एका खुनाचा प्लॅन. आणि त्यातून घडणारे कथानक. स्वप्नील जोशी सुबोध भावे अनिता दाते शिवानी सुर्वे अशी ४ मुख्य पात्र ( आणि खरतर तेवढीच पात्र आहेत). साधारणपणे २४ तासात घडणारी गोष्ट.  पण सुरवातीपासून शेवटपर्यंत जे काही पडद्यावर चालू असते ते निव्वळ भन्नाट. एखादा माणूस असं काहीतरी करू शकतो आणि त्याला वाळवी असलं विचित्र किड्याचे नाव देऊन तो चित्रपट थिएटर मध्ये लावू शकतो हेच मानलं पाहिजे. 

चित्रपटाची अगदी पहिल्या फ्रेम पासून शेवटच्या फ्रेम पर्यंत मांडणी इतकी व्यवस्थित आणि सुसंगत आहे की पहिल्या भागात घडत जाणाऱ्या गोष्टीला मध्यंतरात जेव्हा ब्रेक येतो तेव्हा चित्रपटातल्या पात्रांवरोबर प्रेक्षक ही बुचकळ्यात पडतो. आणि आता पुढे काय ? असा प्रश्न पडतो. मध्यंतरानंतर चित्रपट जो सुरू होती आणि एकामागोमाग एक अश्या घटना घडत जातात की मती गुंग होते. आणि शेवटी एका अनपेक्षित शेवट होऊन अचानक पिक्चर संपतो. वेगाने घडणारे कथानक असे थांबते की प्रेक्षक अवाक होतात. 

सर्व कलाकारांचा उत्तम अभिनय झाला आहे. कुठेही मेलोड्रामा नाही. जास्त कलाकाराचा मेक अप नाही. गाणी नाहीत. स्वप्नील जोशी आणि सुबोध भावे तर कसलेले अभिनेते आहेतच, पण तुलनेने ज्युनिअर आणि नवीन असलेल्या शिवानी सूर्वेनी ही डेंटिस्ट च्या भूमिकेत झकास काम केले आहे. अनिता दातेना वाव खूप कमी आहे. संकलन, पार्श्व संगीत, कथा व इतर तांत्रिक बाजू झी ची निर्मिती असल्याने उत्तम आहेतच. 

एकूण काय, ही "वाळवी " अनुभवण्यास नक्की जा. तुम्हाला परेश मोकशीचे आधीचे तिन्ही चित्रपट आवडले असतील तर हा तुम्ही नक्की एन्जॉय कराल. एकदम छान चित्रपट.